Ad will apear here
Next
देशातील दुसरे रिट्झ-कार्ल्टन हॉटेल पुण्यात सुरू
आदरातिथ्य क्षेत्रातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित

पुणे : आलिशान हॉटेल्सचा आघाडीचा ब्रँड म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या रिट्झ-कार्ल्टनचे पुण्यात आगमन झाले आहे. भारतातील हे दुसरे रिट्झ-कार्ल्टन हॉटेल आहे. यामुळे आदरातिथ्य क्षेत्रातील पुण्याचे महत्त्व अधोरेखित झाले असून, पुण्याच्या दिमाखात अधिकच भर पडली आहे. येरवडा परिसरातील गोल्फ कोर्सजवळ ‘बिझनेस बे’लगत हे अलिशान हॉटेल साकारले आहे. २१ ऑक्टोबरपासून हे हॉटेल ग्राहकांच्या सेवेत दाखल होत आहे. 

आदरातिथ्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनी मॅरिएट इंटरनॅशनलच्या उंची हॉटेल्सच्या श्रेणीतील एक आघाडीचा ब्रँड म्हणून रिट्झ-कार्ल्टन हॉटेलची ओळख आहे. भारतात आतापर्यंत फक्त बेंगळुरू येथे हे हॉटेल होते. त्यानंतर हे हॉटेल पुण्यात सुरू झाले आहे. संपूर्ण जगभरात केवळ ९९ रिट्झ-कार्ल्टन हॉटेल्स आहेत.  

  रिट्झ-कार्ल्टनच्या शुभारंभाच्या घोषणेप्रसंगी पंचशील रिअल्टीच्या हॉस्पिटॅलिटी विभागाचे अध्यक्ष रणजित बात्रा, हॉटेलचे महाव्यवस्थापक विनीत मिश्रा व मॅरिएट इंटरनॅशनलच्या दक्षिण आशिया विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नीरज गोविल.        

‘बेंगळुरूनंतर पुण्यात रिट्झ-कार्ल्टन सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात माहिती तंत्रज्ञान, वाहन आणि अन्य व्यवसाय वाढत आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या आंतरराष्ट्रीय ग्राहकवर्गाला आणि आलिशान सुविधांचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक असलेल्या तरुण पिढीला एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. रिट्झ-कार्ल्टनमुळे पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, येथील आदरातिथ्य क्षेत्राला यामुळे नवा आयाम मिळाला आहे,’ असे मत मॅरिएट इंटरनॅशनलच्या दक्षिण आशिया विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नीरज गोविल यांनी व्यक्त केले. 

‘रिट्झ कार्ल्टनचा सेवा व आदरातिथ्याचा अनुभव अत्यंत अद्वितीय आहे. हा अनुभव पुण्यामध्ये देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या हॉटेलच्या डिझाइनपासून इथल्या सुख-सुविधांपर्यंत प्रत्येक गोष्ट ही भव्य आणि आलिशान आहे. पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा अनोखा संगम इथल्या प्रत्येक गोष्टीत दिसून येतो. या शहराचा इतिहास व उत्साहाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने येथे अत्यंत देखणे रूफटॉफ लाउंज आहे. भव्य गोल्फ कोर्सचे दृश्य या हॉटेलच्या सौंदर्यात भर घालते. या हॉटेलमध्ये १९८ आलिशान खोल्या आणि ३५ सूटस आहेत. यामध्ये एक विशेष प्रेसिडेन्शियल सूट असून, तो तब्बल तीन हजार १५४ चौरस फुटांचा आहे. युकियो हे आधुनिक जॅपनीज रेस्टॉरंट हे याचे खास वैशिष्ट्य आहे. योगा डेक, स्पा, मिटिंग रूम्स, भव्य हॉल अशा अनेक सुविधा येथे आहेत’, अशी माहिती या हॉटेलचे महाव्यवस्थापक विनीत मिश्रा यांनी दिली. या वेळी पंचशील रिअल्टीच्या हॉस्पिटॅलिटी विभागाचे अध्यक्ष रणजित बात्रा उपस्थित होते. 

जगातील सर्वोत्तम हॉटेल पुण्यात असले पाहिजे, या ध्यासाने पंचशील रिअल्टी आणि पूनावाला समूहाने रिट्झ कार्ल्टनसारखा ब्रँड येथे आणला आहे. यामुळे आदरातिथ्य क्षेत्रातील रोजगार निर्मिती; तसेच पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळणार आहे.   
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZUKCF
Similar Posts
तनाएराचे महाराष्ट्रातील पहिले दालन पुण्यात सुरू पुणे : देशभरातील हातमागावरील साड्या उपलब्ध करून देणाऱ्या टायटन कंपनीच्या तनाएरा ब्रँडचे महाराष्ट्रातील पहिले दालन पुण्यात सुरू झाले आहे. औंधमधील पुष्पक पार्क येथील या दालनाचे उद्घाटन अभिनेत्री श्रुती मराठे हिच्या हस्ते झाले. या वेळी तनाएराच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर राजेश्वरी श्रीनिवासन उपस्थित होत्या.
‘उद्योगांनी अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करून घेणे आवश्यक’ पुणे : ‘अत्यंत अद्ययावत असे ‘इंडस्ट्री फोर पाँईंट झीरो’ तंत्रज्ञान, ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’, ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) आणि ‘मशीन लर्निंग’ हे आजच्या जगातील परवलीचे शब्द झाले आहेत. उद्योग क्षेत्रातील ही आव्हाने असून, लवकरात लवकर त्यांचा सामना करून नवे तंत्रज्ञान अवगत करून
तिसरी आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषद नेदरलँडमध्ये पुणे : ‘जागतिक पातळीवर आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि नेदरलँड येथील प्रेमदानी आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ आणि २६ ऑक्टोबर २०१९ ला ही परिषद डेनहॅगमधील गांधी सेंटर (इंडियन
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील जागतिक संशोधन स्पर्धेत पुणेकर आनंद ललवाणी यांना यश पुणे : ‘आयओटी’ अर्थात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संशोधनाद्वारे मानवी समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी घेण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेत पुण्यातील आनंद ललवाणी यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language